मिसळ

मिसळ आणि कोल्हापूर हे एक अतूट नातं आहे. मिसळीच्या मागे कोल्हापुरी हा शब्द हवाच हवा. मिसळ खाताना नाका-डोळ्यांतून पाणी आलंच पाहिजे, घाम फुटलाच पाहिजे! मटकीची उसळ, बटाट्याचा रस्सा, फरसाण, बारीक चिरलेला कांदा, लिंबू, कोथिंबीर असा सगळा जामानिमा केल्यावर मिसळ चवदार नाही लागली तर नवलच! काही ठिकाणी मिसळीमधे फोडणीचे कांदे-पोहे पण घालतात. काही वर्षांपूर्वी कोल्हापूरला गेलोContinue reading “मिसळ”

पाव-भाजी

पाव-भाजी हा आपल्याकडे मिळणारा एक अफलातून प्रकार. विशेषतः बंबईय्या पाव-भाजी तर विशेष प्रसिध्द आहे. अर्थात मी माझ्या नव-याबरोबर वाद घालते की औरंगाबादला क्रांती चौकात मिळणारी कैलास पाव-भाजी ही मी आत्तापर्यंत खाल्लेली सर्वोत्तम पाव-भाजी आहे! कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, बटाटा, वाटाणा अगदी लगदा होईपर्यंत शिजवून, त्यात लसूण-मिरची-जि-याचं वाटण घालून अमूल बटरमधे केलेली खमंग भाजी आणि बरोबरContinue reading “पाव-भाजी”