रोज जेवायला काय करायचं हा यक्षप्रश्न असतो. म्हणजे स्वयंपाकापेक्षाही तो विचारच जास्त त्रास देतो. थोडंसं नियोजन केलं, त्यानुसार यादी करून खरेदी केली आणि थोडीशी पूर्वतयारी केली तर मग हा प्रश्न तितकासा त्रास देणार नाही. मी स्वयंपाकाचं नियोजन कसं करते हे मी तुम्हाला सांगते. आमच्या बांद्रा इस्टमध्ये, आमच्या घरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर रोज भाजी बाजार भरतो.Continue reading “स्वयंपाकाचं नियोजन – ४”
Tag Archives: Maharashtrian Rayta
दुधी भोपळ्याचं रायतं आणि कच्च्या मटकीची कोशिंबीर
अनंत चतुर्दशी दोन दिवसांवर आली आहे. दहा दिवसांचे गणपती सोडले तर बहुतेकांच्या घरातल्या गणरायाचं विसर्जन झालंय. श्रावणापासून ते आतापर्यंत वेगवेगळ्या सणांच्या निमित्तानं भरपूर गोडधोड खाऊन झालंय. मनात कुठेतरी अपराधीपणाची भावना डोकं वर काढतेय, की फारच अरबट-चरबट खाल्लंय का गेल्या काही दिवसांत आपण? आता येते काही दिवस जरा डाएटकडे विशेष लक्ष द्यावं असंही वाटायला लागलंय. म्हणूनचContinue reading “दुधी भोपळ्याचं रायतं आणि कच्च्या मटकीची कोशिंबीर”