सोलापुरी मसाल्यातली चवळीची उसळ

अन्न हेच पूर्णब्रह्मची एक मैत्रीण सुपर्णा राखे-भोसले हिनं मला मध्यंतरी एक मेसेज पाठवला होता. तिला हे पेज खूप आवडतं आणि या पेजमुळे तिला खूप मदत होते असं तिनं या मेसेजमध्ये कळवलं होतं. सुपर्णा ही मूळची सोलापूरची. लग्न होऊन ती मुंबईत आली. ती एका खाजगी बँकेत टेक्नॉलॉजी विभागात काम करते. लग्नापूर्वी तिला स्वयंपाक करायला आवडायचं पणContinue reading “सोलापुरी मसाल्यातली चवळीची उसळ”

स्वयंपाकाचं नियोजन – ४

रोज जेवायला काय करायचं हा यक्षप्रश्न असतो. म्हणजे स्वयंपाकापेक्षाही तो विचारच जास्त त्रास देतो. थोडंसं नियोजन केलं, त्यानुसार यादी करून खरेदी केली आणि थोडीशी पूर्वतयारी केली तर मग हा प्रश्न तितकासा त्रास देणार नाही. मी स्वयंपाकाचं नियोजन कसं करते हे मी तुम्हाला सांगते. आमच्या बांद्रा इस्टमध्ये, आमच्या घरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर रोज भाजी बाजार भरतो.Continue reading “स्वयंपाकाचं नियोजन – ४”

पेंडभाजी किंवा पेंडपाला

महाराष्ट्रातल्या बहुतेक गावांमधे भाकरीबरोबर वरणाचे किंवा डाळीचे घट्ट प्रकार खाण्याची पध्दत आहे. विदर्भात आणि मराठवाड्यात गोळा वरणाबरोबर किंवा घट्ट पिठल्याबरोबर भाकरी खातात. आमच्याकडे मराठवाड्यात तुरीचं शिजवलेलं घट्ट वरण, त्यावर कच्चं तेल, तिखट, काळा मसाला घालून, वर बारीक चिरलेलं कांदा-कोथिंबीर घालून खातात. कच्चं तेल आवडत नसेल तर मग लसणाची फोडणी घालूनही खाता येतं. हे वरण गारचContinue reading “पेंडभाजी किंवा पेंडपाला”

तुरीच्या दाण्यांची उसळ

पावसाळा सुरू झाला की पालेभाज्या फारशा मिळतही नाहीत आणि त्या कराव्याशाही वाटत नाहीत. मग त्याच त्याच फळभाज्या खाऊन कंटाळा येतो. अशा वेळी कडधान्यांचा मोठा आधार असतो. साधारणपणे उसळी सगळ्यांना आवडतात. हवं तर मसालेदार रस्सा करा किंवा साध्या फोडणीच्या करा, कडधान्यांना आपली स्वतःची अशी खास चव असते त्यामुळे ती चवदारच लागतात. मसूर, मूग, मटकी, चणे, चवळीContinue reading “तुरीच्या दाण्यांची उसळ”