भोगीचं जेवण

तर आजची ही पहिली पोस्ट आहे धुंदुरमासाच्या जेवणाची. म्हणजेच भोगीला केल्या जाणा-या स्वयंपाकाची. ही पोस्ट गेल्या वर्षीचीच आहे. नवीन लोकांसाठी परत पोस्ट करते आहे. गेल्या वर्षी भोगीच्या भाजीचे फोटो काढलेले नव्हते ते आज मुद्दाम काढून शेअर करते आहे. आज धुंदुरमासाचा शेवटचा दिवस, भोगी. महाराष्ट्रात भोगीला खास जेवण केलं जातं. याला धुंदुरमासाचं जेवण असंही म्हणतात. हेContinue reading “भोगीचं जेवण”

नववर्षाचं स्वागत

हा हुरड्याचा मोसम आहे. हुरडा म्हणजे ओली, कोवळी ज्वारी हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. महाराष्ट्रात गावोगावी या दिवसात हुरडा पार्ट्या होतात. ताजा भाजलेला हुरडा, बरोबर दाण्याची, लसणाची, तिळाची झणझणीत तिखट चटणी, हुरड्याच्या ताटानं खायला दही-साखर, बरोबर बोरं, टहाळा (ओला हरभरा), उसाच्या गंडे-या. शिवाय डाळ-बाटीचं किंवा बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, खिचडी असं जेवण. पण हे सगळंContinue reading “नववर्षाचं स्वागत”

भरली वांगी

मसाला भरून भाज्या किंवा मांसाहारी पदार्थ करण्याची पध्दत जगभर प्रचलित आहे. स्टफ्ड मश्रूम्स, स्टफ्ड पटेटोज विथ चीज, स्टफ्ड कॅप्सिकम असेल किंवा टर्किश रेसिपी डोल्मा (Dolma) असेल या सगळ्या भरून केल्या जाणा-या पाककृती आहेत. भारतातही बहुतांश सगळ्या प्रांतांमध्ये भरून भाज्या करण्याची पध्दत आहेच. आपल्याकडेही भरली कारली, भरली भेंडी, भरलं पडवळ, भरली वांगी केली जातातच. हैदराबादला म्हणजेContinue reading “भरली वांगी”

कांदा-टोमॅटो-बटाट्याचा साधा रस्सा

बटाटा ही भाजी बहुतेक सगळ्यांना आवडते. बटाट्याच्या साध्या काच-या असोत, बटाटे उकडून केलेली साधी, कोथिंबीर-कढीपत्ता घातलेली भाजी असो, बटाट्याची उपासाची भाजी असो, कांदा-खोब-याचं वाटण लावलेला रस्सा असो किंवा कांदा घालून केलेली जास्त तेलातली चमचमीत भाजी असो, बटाट्याची किती तरी पध्दतीनं भाजी करता येते. अर्थात बटाटा ही खरंतर तशी भाजी नव्हेच. बटाटा हा मुख्यत्वे पिष्टमय पदार्थ.Continue reading “कांदा-टोमॅटो-बटाट्याचा साधा रस्सा”

ऋषिपंचमीची भाजी, ऋषीची भाजी किंवा कंदमूळ

ऋषिपंचमीच्या दिवशी एक खास भाजी केली जाते, तिला ऋषिपंचमीची भाजी असंच म्हणतात. सारस्वतांमधे या भाजीला कंदमूळ म्हणतात. ऋषी कंदमूळं खाऊन आपली गुजराण करत असत म्हणून ही भाजी कंदमूळ. या भाजीत अर्थातच बरेचसे कंद घालतात. शिवाय ब-याचजणांना एरवी ज्या भाज्या अजिबात आवडत नाहीत अशा किती तरी भाज्या यात घालतात. थोडक्यात ही एक मिसळीची भाजी किंवा मिक्सContinue reading “ऋषिपंचमीची भाजी, ऋषीची भाजी किंवा कंदमूळ”

मेथी-वांगं-बटाटा भाजी

स्वतंत्रपणे मेथीची किंवा वांग्याची भाजी न आवडणारे अनेक लोक असतील. पण मी आज जी मेथी-वांगं-बटाटा भाजीची रेसिपी शेअर करणार आहे ती अतिशय फर्मास लागते. ती सगळ्यांना नक्की आवडेल. कारण या भाजीला कुठलेही मसाले घालायचे नाहीत, अगदी हळदही नाही. त्यामुळे या भाजीची चव उत्कृष्ट लागते. ही भाजी मी माझ्या सासुबाईंकडून शिकले आहे. SNDT विद्यापीठाच्या माजी कुलगुरूContinue reading “मेथी-वांगं-बटाटा भाजी”

कारल्याची चिंच-गुळाची भाजी

मुळा, कंटोळी किंवा कर्टुली, परवर, कारलं एवढंच काय अगदी मेथीही; या भाज्या अशा आहेत की त्यांची चवच आवडावी लागते. या भाज्या खूप आवडणारे नाही तर अजिबात न आवडणारे असेच दोन प्रकार असतात. फ्लॉवर, कोबी किंवा तत्सम भाज्या आवडत नसतील तर निदान चालतात तरी. पण मी वर उल्लेख केलेल्या भाज्यांबद्दल तसं नाही म्हणता येत. मला मात्रContinue reading “कारल्याची चिंच-गुळाची भाजी”