लोणच्याची गंमत

औरंगाबादच्या आमच्या घराच्या अंगणात आपोआप उगवलेलं एक आंब्याचं झाड आहे. या झाडाला दरवर्षी भरपूर कै-या लागतात. आणि मुख्य म्हणजे त्या लोणच्याला लागतात तशा आंबट आणि करकरीत आहेत. यावर्षी माझ्या आईनं जवळपास 30-35 किलो कै-यांचं लोणचं घातलं. आम्ही तिघी बहिणी, वहिनी, चुलतभावाची बायको असं सगळ्यांना तिनं लोणचं दिलं. या प्रोजेक्ट लोणचं चे फोटो तुमच्यासाठी शेअर करतेय.Continue reading “लोणच्याची गंमत”

कैरीचं लोणचं आणि तक्कू

उन्हाळ्यातला शेवटचा साठवणीचा पदार्थ म्हणजे कैरीचं टिकाऊ लोणचं. तोपर्यंत कैरीचं तात्पुरतं लोणचं, तात्पुरता तक्कू, किसवंती, कैरी-कांद्याचं लोणचं, कैरी-कांद्याची चटणी, मेथांबा, आंबा डाळ हे सगळे पदार्थ मनसोक्त खाऊन झालेले असतात. कैरीला निरोप देताना मात्र तिची आठवण म्हणून वर्षभराचं टिकाऊ लोणचं घातलं जातंच. माझी आई कैरीचं साधं लोणचं, का-हळ आणि लसूण घालून केलेलं लोणचं, आंध्र पद्धतीचं आलं-लसूणContinue reading “कैरीचं लोणचं आणि तक्कू”