परदेशातल्या पार्टीसाठी पदार्थ – २

याआधी जी स्वतंत्र पोस्ट लिहिली होती त्यात मी अमृता पाटील आणि मधुरा गद्रे या परदेशातल्या दोन मैत्रिणींनी सुचवल्याप्रमाणे व्हेजिटेरियन स्टार्टर्सबद्दल लिहिलं होतं. परदेशात राहात असताना सगळं स्वतःलाच करायचं असतं, आपल्यासारखी घरकामातली मदत तिथे मिळत नाही. शिवाय भारतीय स्वयंपाकात लागणारे घटक पदार्थ परदेशात सगळीकडे उपलब्ध असतीलच असं नाही. त्यामुळे कमीत कमी घटक पदार्थात काय काय करताContinue reading “परदेशातल्या पार्टीसाठी पदार्थ – २”

परदेशातल्या पार्टीसाठी पदार्थ – १

अन्न हेच पूर्णब्रह्मचे अनेक वाचक परदेशातले आहेत. त्यातले अनेकजण पोस्ट वाचून मेसेज करतात, त्यांना एखाद्या विषयावर माहिती हवी असेल तर तसंही सांगतात. स्टिव्हन्सविल, मिशीगन इथे राहणा-या मधुरा गद्रे यांनी व्हेजिटेरियन पार्टीसाठीचे काही मेन्यू सुचवायला सांगितलं आहे. तर स्टॉकहोमला राहणा-या अमृता पाटील यांनी काही स्टार्टर्स सुचवायला सांगितलं आहे. आजची ही पोस्ट त्याबद्दलच. मांसाहारी पदार्थ खाणारे लोकContinue reading “परदेशातल्या पार्टीसाठी पदार्थ – १”

कांद्याचे पदार्थ

काल एपिक या चॅनलवर ‘लॉस्ट रेसिपीज’ या कार्यक्रमात अनोखी खीर हा पदार्थ बघितला. ही खीर खरोखरच अनोखी होती कारण ही खीर कांद्याची होती! कांद्याची खीर करतात हे तर मी पहिल्यांदाच बघितलं. कांदा आणि गोड पदार्थ ही कल्पनाच कशीशीच वाटते. आपल्याकडे कांदा गुळाच्या पाकात घालून एक पदार्थ केला जातो. पण गोड पदार्थात सर्रास कांदा वापरला जातContinue reading “कांद्याचे पदार्थ”