दही बुत्ती किंवा दही भात

मला स्वतःला भाताचे प्रकार खूप आवडतात. मग तो मसालेभात असो, पुलाव, बिर्याणी, चित्रान्न, सांबारभात, फोडणीचा भात अगदी आमटी-भात, वरण-भात असा कुठलाही प्रकार असो. खरं तर पोळी-भाकरीशिवाय माझं भागत नाही. पण शेवटी घासभर भात असला तर मग कसं जेवल्याचं समाधान वाटतं. आमच्याकडे रोज भात होत नाही. खरं सांगायचं तर सकाळी तर माझ्या घरी पोळी-भाजी-कोशिंबीर-ताक असंच जेवणContinue reading “दही बुत्ती किंवा दही भात”

झटपट दाल फ्राय आणि झटपट जिरा राईस

या आधी मी पनीरच्या भाजीची झटपट रेसिपी शेअर केली होती. त्या पोस्टमधे शेवटी मी लिहिलं होतं की ही भाजी, झटपट दालफ्राय आणि पराठ्यांबरोबर किंवा साध्या पोळ्यांबरोबर छान लागते. आज मी त्याच झटपट दाल फ्रायची रेसिपी शेअर करणार आहे. हे दाल फ्राय तुम्ही या भाजीबरोबर करा किंवा जिरा राईसबरोबर किंवा पुलावबरोबर करा, उत्तम लागतं आणि खरोखरContinue reading “झटपट दाल फ्राय आणि झटपट जिरा राईस”

कॉर्न पुलाव

स्वीट कॉर्न किंवा अमेरिकन कॉर्नला गेल्या काही वर्षांत फारच महत्व मिळालं आहे. एके काळी आपल्याकडे सर्रास पांढरी कणसं मिळायची. या कणसांचे दाणे फार गोड नसायचे. त्यामुळे त्यांची उसळ छान लागायची किंवा नुसतं भाजून तूप-मीठ लावून खायलाही ही कणसं मस्त लागायची. पण गेल्या काही वर्षांत ही कणसं बाजारातून जवळपास हद्दपार झाली आहेत. अगदी ठराविक ठिकाणीच हीContinue reading “कॉर्न पुलाव”