जागतिक मधुमेह दिन

मधुमेह टाळायचा असेल किंवा नियंत्रित ठेवायचा असेल तर सक्रिय जीवनशैली, सकस आहार आणि पूरक व्यायाम या त्रिसूत्रीचा अवलंब करायला हवा. तो करणं अजिबात अवघड नाही हे स्वानुभवानं सांगते फक्त मनाचा निग्रह मात्र हवा.

डाएटसाठी चालतील असे पदार्थ

मी गेल्या आठवड्यापासून थोडंसं विचारपूर्वक खायचं ठरवलं आहे. म्हणजे खरंतर मी कधीच फार बेजबाबदारपणे खात नाही. पण तरीही वाढत्या वयानुसार गेल्या वर्षभरात ५-६ किलोंची कमाई केली आहे. त्यातले निदान २-३ किलो कमी करावेत असा प्रयत्न आहे. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून मी नियमितपणे, व्यवस्थित खाते आहे. डाएटिंग करताना पाळण्याचा महत्त्वाचा नियम म्हणजे कधीच क्रॅश डाएट करूContinue reading “डाएटसाठी चालतील असे पदार्थ”

सूपचे काही प्रकार

सध्या मी थोडंसं चांगलं खाण्याचा, हेल्दी खाण्याचा प्रयत्न करतेय. मी रोज काय खाते ते मी पोस्ट करत असतेच. अनेकांनी सूपच्या रेसिपीज शेअर करायला सुचवलंय. खरं सांगायचं तर सूपला अशी काही खास रेसिपी नाही. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या भाज्यांची काँबिनेशन्स करून चवीला चांगली सूप्स बनवता येतात. त्यात वेगवेगळ्या प्रकारची हर्ब्ज घातले की चवही बदलते. मीठ-मिरपूड तर आपणContinue reading “सूपचे काही प्रकार”

हेल्थ इज वेल्थ

कशी झाली सगळ्यांची दिवाळी? मस्तच झाली असेल ना? माझीही दिवाळी मस्त झाली. मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांचा सहवास, खुसखुशीत फराळ, खूपसे दिवाळी अंक, शांतपणे तेवत असलेले भरपूर दिवे, दारात छानशी रांगोळी, उत्तम खाणं-पिणं आणि मुख्य म्हणजे सगळे ताणतणाव दूर सारून निवांत होणं हे सगळं म्हणजेच माझ्यासाठी दिवाळी. आणि हे सगळं मी छानपैकी अनुभवलं. त्याआधी महिनाभर अंकाची खूपContinue reading “हेल्थ इज वेल्थ”

स्वयंपाकघर आवरणं

आपण घर रोज कितीही नीटनेटकं, स्वच्छ ठेवत असू तरी घरात नको असलेल्या गोष्टींची संख्या वाढत जातेच. आणि कधीतरी अशी वेळ येते की आपल्याला त्यांचं ओझं व्हायला लागतं आणि त्या गोष्टी काढून टाकून घराला मोकळा श्वास घ्यायला देणं आवश्यक आहे असं वाटायला लागतं. निदान मला तरी असं होतं. याचं कारण असं आहे की मला कुठलाच कचरा,Continue reading “स्वयंपाकघर आवरणं”

परदेशातल्या पार्टीसाठी पदार्थ – २

याआधी जी स्वतंत्र पोस्ट लिहिली होती त्यात मी अमृता पाटील आणि मधुरा गद्रे या परदेशातल्या दोन मैत्रिणींनी सुचवल्याप्रमाणे व्हेजिटेरियन स्टार्टर्सबद्दल लिहिलं होतं. परदेशात राहात असताना सगळं स्वतःलाच करायचं असतं, आपल्यासारखी घरकामातली मदत तिथे मिळत नाही. शिवाय भारतीय स्वयंपाकात लागणारे घटक पदार्थ परदेशात सगळीकडे उपलब्ध असतीलच असं नाही. त्यामुळे कमीत कमी घटक पदार्थात काय काय करताContinue reading “परदेशातल्या पार्टीसाठी पदार्थ – २”

परदेशातल्या पार्टीसाठी पदार्थ – १

अन्न हेच पूर्णब्रह्मचे अनेक वाचक परदेशातले आहेत. त्यातले अनेकजण पोस्ट वाचून मेसेज करतात, त्यांना एखाद्या विषयावर माहिती हवी असेल तर तसंही सांगतात. स्टिव्हन्सविल, मिशीगन इथे राहणा-या मधुरा गद्रे यांनी व्हेजिटेरियन पार्टीसाठीचे काही मेन्यू सुचवायला सांगितलं आहे. तर स्टॉकहोमला राहणा-या अमृता पाटील यांनी काही स्टार्टर्स सुचवायला सांगितलं आहे. आजची ही पोस्ट त्याबद्दलच. मांसाहारी पदार्थ खाणारे लोकContinue reading “परदेशातल्या पार्टीसाठी पदार्थ – १”

अळूवडी

श्रावणात उत्तम पालेभाज्या मिळतात. शिवाय ब-याचशा रानभाज्याही मिळतात. विशेषतः कोकणात रानभाज्या ब-याच मिळतात. श्रावणात हमखास केली जाणारी पालेभाजी म्हणजे अळू. अळूची ब्राह्मणी पद्धतीनं केलेली चिंचगूळ घातलेली भाजी फर्मास लागते. सारस्वतांमध्ये अळूची चिंचेचा कोळ आणि खोब-याचं वाटण लावून भाजी करतात. पण मला ती फारशी आवडत नाही. अळूचा कुठलाही पदार्थ करताना त्याला चिंचेचा कोळ लावतातच, याचं कारणContinue reading “अळूवडी”

दिव्यांची रसमलाई

आषाढातला शेवटचा दिवस म्हणजे दिव्यांची अमावस्या. या सुरेख सणाला आता गटारी अमावस्या या नावानं ओळखलं जातं. आपल्या रोजच्या आयुष्यात ज्या-ज्या गोष्टींचा वापर होतो त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे सण पाळले जातात. शेतात वर्षभर राबणा-या बैलासाठी पोळा किंवा बेंदूर, शेतक-याचा मित्र असलेल्या नागोबाच्या पूजेचा नागपंचमी, चुलीला विश्रांती द्यायची म्हणून शिळासप्तमी तसंच आपल्याला कायम उजेड देणा-याContinue reading “दिव्यांची रसमलाई”

अन्न हेच पूर्णब्रह्मची दोन वर्षं

२१ जुलैला अन्न हेच पूर्णब्रह्म हा ब्लॉग सुरू करून २ वर्षं पूर्ण झाली. अचानक आलेल्या विचारातून या पेजचा जन्म झाला आणि वाचकांच्या भरभरून मिळणा-या प्रतिसादामधून या पेजचं रूप निश्चित झालं. साध्या, सोप्या, रोजच्या जेवणातल्या पाककृती या पेजवर शेअर करायच्या असं मी पहिल्यापासून ठरवलं होतं. याचं कारण असं की मला स्वतःला रोज फार गुंतागुंतीचा स्वयंपाक करायलाContinue reading “अन्न हेच पूर्णब्रह्मची दोन वर्षं”