माझ्या दोन्ही मुलींना मांसाहारी पदार्थ खूप आवडतात. खरं तर म्हणूनच मी मांसाहारी पदार्थ करायला शिकले. माझ्या धाकट्या मुलीला, शर्वरीला चिकनचा तिखट रस्सा खायची लहर अधूनमधून येत असते. आज मी जी रेसिपी शेअर करणार आहे ती माझी मुलगी शर्वरी हिची मैत्रीण प्राचीसाठी. काही दिवसांपूर्वी प्राचीच्या आईनं (जी माझीही मैत्रीण आहे) मला प्राचीसाठी चिकनच्या काही चमचमीत रेसिपीजContinue reading “झटपट चिकन”
Tag Archives: Non-Veg Maharashtrian Recipe
तिस-यांची ( शिंपल्यांची ) आमटी
माझं माहेर देशस्थ आणि सासर सारस्वत. त्यामुळे दोन्ही घरांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बराच फरक होता. देशस्थ मूळ शाकाहारी तर सारस्वत पक्के मांसाहारी. तरी माझ्या सासुबाई ( विजया राजाध्यक्ष ) या पूर्वाश्रमीच्या कोकणस्थ असल्यानं आमच्या घरी इतर सारस्वतांच्या मानानं शाकाहारी जेवणाचं प्रमाण जास्त होतं. मी शुध्द शाकाहारी आहे. लग्न होईपर्यंत मी मासे कधी बघितलेही नव्हते. माझा नवराContinue reading “तिस-यांची ( शिंपल्यांची ) आमटी”
कोलंबीचं लोणचं
कोलंबी, तिस-या, खेकडे किंवा चिंबो-या, कालवं हे शेलफिशचे प्रकार (म्हणजे जे मासे कवचात असतात असे माशांचे प्रकार ) फार चविष्ट लागतात असं म्हणतात. म्हणतात असं यासाठी म्हणतेय की मी स्वतः शाकाहारी आहे त्यामुळे मला माशांची चव माहीत नाही. आज मी जी रेसिपी शेअर करणार आहे ती एका अर्थानं आमची खानदानी रेसिपी आहे असं म्हणता येईल!Continue reading “कोलंबीचं लोणचं”