बिसी बेळे भात

भातांचे प्रकार म्हणजे अहाहा! खरं तर मी स्वतः नुसता भात खूप खाऊ शकत नाही. पण तरीही भात खूप आवडतो. आमच्या घरी सकाळच्या वेळेला बरेचदा फक्त पोळी-भाजी-कोशिंबीर-ताक असंच असतं कारण डबे असतात. पण संध्याकाळच्या वेळेला आठवड्यातून निदान तीनदा तर भाताचे काही ना काही प्रकार असतात. खिचडी, मटार भात, वांगी भात, पुलाव, सांबार भात, आमटी भात, ताकातलाContinue reading “बिसी बेळे भात”

मॅकरोनी विथ चीज

कितीही वेगववेगळ्या प्रकारचे पदार्थ केले तरी माझ्या मुलींना असं वाटतं की मी खायला तेच ते करते. मग एखाद्या दिवशी दोघीही जणी आज चांगलं काही तरी खायला कर असं म्हणतात. त्यांच्या भाषेत चांगलं काही तरी म्हणजे, मैदा, बटर, चीज असं रिफांइड साहित्य वापरलेले पदार्थ! जे फारसे वापरायला मी तयार नसते. म्हणजे मी रेडीमेड बटरऐवजी घरी केलेलंContinue reading “मॅकरोनी विथ चीज”

कॉर्न पुलाव

स्वीट कॉर्न किंवा अमेरिकन कॉर्नला गेल्या काही वर्षांत फारच महत्व मिळालं आहे. एके काळी आपल्याकडे सर्रास पांढरी कणसं मिळायची. या कणसांचे दाणे फार गोड नसायचे. त्यामुळे त्यांची उसळ छान लागायची किंवा नुसतं भाजून तूप-मीठ लावून खायलाही ही कणसं मस्त लागायची. पण गेल्या काही वर्षांत ही कणसं बाजारातून जवळपास हद्दपार झाली आहेत. अगदी ठराविक ठिकाणीच हीContinue reading “कॉर्न पुलाव”

पाव-भाजी

पाव-भाजी हा आपल्याकडे मिळणारा एक अफलातून प्रकार. विशेषतः बंबईय्या पाव-भाजी तर विशेष प्रसिध्द आहे. अर्थात मी माझ्या नव-याबरोबर वाद घालते की औरंगाबादला क्रांती चौकात मिळणारी कैलास पाव-भाजी ही मी आत्तापर्यंत खाल्लेली सर्वोत्तम पाव-भाजी आहे! कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, बटाटा, वाटाणा अगदी लगदा होईपर्यंत शिजवून, त्यात लसूण-मिरची-जि-याचं वाटण घालून अमूल बटरमधे केलेली खमंग भाजी आणि बरोबरContinue reading “पाव-भाजी”

ज्वारीच्या पिठाची थालिपीठं

माझ्या आईकडे ज्वारीच्या पिठाचा मुबलक वापर करतात. ब-याच पदार्थात व्यंजन म्हणून ज्वारीचं पीठ वापरतात. आई तर भजी करतानाही डाळीच्या पिठाबरोबर थोडंसं ज्वारीचं पीठ घालते, त्यामुळे भजी खुसखुशीत होतात. माझ्या माहेरी थालिपीठं ही ज्वारीच्याच पिठाची होतात. भाजणीचं थालिपीठ फार क्वचित केलं जातं. शिवाय बरेचजण थालिपीठं तळतात. आमच्याकडे थालिपीठं तव्यावर लावतात. आई तर पूर्वी जड बुडाच्या पातेल्यातContinue reading “ज्वारीच्या पिठाची थालिपीठं”

क्रीम ऑफ टोमॅटो सूप आणि ओपन टोस्ट

मुंबईत गेले चार-पाच दिवस छान पाऊस पडतोय. अशी मस्त पावसाळी हवा असताना गरमागरम भजी किंवा बटाटेवडे किंवा भाजलेलं मक्याचं कणीस तर खायलाच हवं. रात्री बाहेरचे इतर आवाज शांत झाल्यावर फक्त पावसाचा येणारा आवाज! अहा! आयुष्य सुंदर आहे! अशा या पावसाळी हवेत जेवणासाठी मस्तपैकी गरम सूप आणि त्याबरोबर काहीतरी चटकमटक खायला असेल तर माणसाला आणखी कायContinue reading “क्रीम ऑफ टोमॅटो सूप आणि ओपन टोस्ट”