श्रावणात उत्तम पालेभाज्या मिळतात. शिवाय ब-याचशा रानभाज्याही मिळतात. विशेषतः कोकणात रानभाज्या ब-याच मिळतात. श्रावणात हमखास केली जाणारी पालेभाजी म्हणजे अळू. अळूची ब्राह्मणी पद्धतीनं केलेली चिंचगूळ घातलेली भाजी फर्मास लागते. सारस्वतांमध्ये अळूची चिंचेचा कोळ आणि खोब-याचं वाटण लावून भाजी करतात. पण मला ती फारशी आवडत नाही. अळूचा कुठलाही पदार्थ करताना त्याला चिंचेचा कोळ लावतातच, याचं कारणContinue reading “अळूवडी”
Tag Archives: Traditional Maharashtrian Recipe
दिव्यांची रसमलाई
आषाढातला शेवटचा दिवस म्हणजे दिव्यांची अमावस्या. या सुरेख सणाला आता गटारी अमावस्या या नावानं ओळखलं जातं. आपल्या रोजच्या आयुष्यात ज्या-ज्या गोष्टींचा वापर होतो त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे सण पाळले जातात. शेतात वर्षभर राबणा-या बैलासाठी पोळा किंवा बेंदूर, शेतक-याचा मित्र असलेल्या नागोबाच्या पूजेचा नागपंचमी, चुलीला विश्रांती द्यायची म्हणून शिळासप्तमी तसंच आपल्याला कायम उजेड देणा-याContinue reading “दिव्यांची रसमलाई”
सुशीला
तांदूळ हे धान्य असं आहे की किती तरी वेगवेगळ्या रूपांमध्ये आपल्या रोजच्या खाण्यात आपण त्याचा वापर करत असतो. पोहे तांदळाचेच असतात, इडली, दोसे तांदळासहच बनतात. तांदळाच्या शेवयांचा उपमा केला जातो. भाताचे तर कितीतरी प्रकार करता येतात. तांदूळ हे जगातलं सगळ्यात जास्त खाल्लं जाणारं कर्बोदक (कार्बोहायड्रेट) आहे. जगातल्या बहुसंख्य देशांमध्ये या ना त्या स्वरूपात तांदूळ खाल्लाContinue reading “सुशीला”
उंबरांची आमटी
मराठवाड्यात ब्राह्मणसदृश जातींमध्ये पूर्वी मांसाहाराचं प्रमाण नगण्य होतं. मांसाहार हा प्रथिनांची गरज पूर्ण करणारा मोठा आणि महत्त्वाचा स्त्रोत आहे. शिवाय मराठवाड्यात वरण फक्त तुरीच्या डाळीचं केलं जायचं आणि तेही खूप पातळ अगदी रस्समसारखं. उडदाची डाळही फार कमी वापरली जायची. मग प्रथिनांची गरज भागवण्याकरता भाजीत, आमटीत चणा डाळीच्या पिठाचे गोळे किंवा उंबरं सोडण्याची प्रथा आली असावी.Continue reading “उंबरांची आमटी”
पंचामृत
गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाचा पहिला दिवस. यादिवशी कडुलिंबाच्या नवीन मोहराचा (माझे आजोबा तौर म्हणायचे) वापर जेवणात करतात. कुठल्यातरी पदार्थात शास्त्रापुरती ही फुलं घालायची पद्धत आहे. अन्न हेच पूर्णब्रह्मचे एक मित्र गिरीश देशमुख यांनी ही फुलं घालून केलेल्या पंचामृताची रेसिपी शेअर करायला सांगितली होती. मी पंचामृताची रेसिपी खाली शेअर करते आहे. त्यातच ही थोडी फुलंContinue reading “पंचामृत”
मेथीफळं
शहरी राहणीमानामुळे म्हणा किंवा मुलांच्या बदललेल्या आवडीनिवडींमुळे म्हणा पण आजकाल बरेचसे पारंपरिक पदार्थ घराघरांमधून हद्दपार झालेले आहेत. आमच्याकडे निरंजन सारस्वत तर मी देशस्थ. सारस्वतांचे फणसाचा तळ, धोंडस, तिरफळं घालून केलेली माशांची वा डाळीची आमटी हे पदार्थ निरंजनला आवडत नाहीत त्यामुळे ते आमच्या घरात केले जात नाहीत. माझ्या सासुबाई मात्र अजूनही क्वचित का होईना पण हेContinue reading “मेथीफळं”
भरलेले कांदे
कांद्याशिवाय भारतीय स्वयंपाकाचा आपण विचारही करू शकत नाही. आपल्याकडे जवळपास ७०-८० टक्के भाज्यांमध्ये फोडणीला कांदा घातला जातो. शिवाय कालवणं, मांसाहारी पदार्थ यांनाही कांदा हवाच. कांद्याची पीठ पेरून भाजी, कांद्याची कोशिंबीर, कांद्याचं रायतं असे किती तरी पदार्थ रोजच्या जेवणात आपण करत असतो. कांदा-मिरची घातलेलं चमचमीत ऑम्लेट काय मस्त लागतं! कच्चा कांदा नसेल तर भेळ, पाव-भाजी, रगडाContinue reading “भरलेले कांदे”
मटार पॅटिस
हिवाळ्याची चाहूल लागली की भारतभरच्या भाजी बाजारांमध्ये हिरव्या, कोवळ्या मटारांचे ढीगच ढीग दिसायला लागतात. पूर्वी बहुतेकदा उत्तर भारतात खाल्ले जाणारे मटार गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातही तितकेच लोकप्रिय झाले आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत आपल्याकडे फक्त हिवाळ्यात ताजे मटार मिळायचे पण आता मात्र वर्षाचे जवळपास ८ महिने मटार बघायला मिळतात. पण मटाराची खरी चव असते ती हिवाळ्यातच. हल्लीContinue reading “मटार पॅटिस”
तेलवांगं
तेलवांगं हा प्रकार मी पहिल्यांदा खाल्ला तो माझ्या मित्राच्या घरी. तोपर्यंत मी या पदार्थाबद्दल फक्त ऐकलं होतं. माझ्या मित्राची गिरीशची बायको दीपा ही कोल्हापूरची आहे. त्यामुळे तिचा स्वयंपाक चमचमीत आणि झणझणीत असतो. खास कोल्हापुरी मसाला घालून केलेलं पिठलं तर ती इतकं अप्रतिम बनवते की फक्त बोटं चाटत राहावं. मी एकदा त्यांच्या घरी राहायला गेले होतेContinue reading “तेलवांगं”
तिळगुळाचे लाडू आणि गूळपोळी
आजची दुसरी पोस्ट आहे तिळगुळाचे मऊ लाडू आणि गूळपोळीची. हे तिळाचे लाडू करायला अतिशय सोपे आणि बिघडण्याची शक्यता शून्य असे आहेत. आपल्याकडे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी-कुंकू केलं जातं. हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमांमध्ये लुटण्याच्या वस्तूंबरोबरच तिळाच्या लाडवांमध्येही वैविध्य असतं. काही घरांमध्ये गुळाचा पाक करून लाडू केले जातात तर काही जण साखरेच्या पाकात करतात. काहीजण त्यात डाळवं, खोबरं, दाणे घालतात.Continue reading “तिळगुळाचे लाडू आणि गूळपोळी”