आषाढातला शेवटचा दिवस म्हणजे दिव्यांची अमावस्या. या सुरेख सणाला आता गटारी अमावस्या या नावानं ओळखलं जातं. आपल्या रोजच्या आयुष्यात ज्या-ज्या गोष्टींचा वापर होतो त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे सण पाळले जातात. शेतात वर्षभर राबणा-या बैलासाठी पोळा किंवा बेंदूर, शेतक-याचा मित्र असलेल्या नागोबाच्या पूजेचा नागपंचमी, चुलीला विश्रांती द्यायची म्हणून शिळासप्तमी तसंच आपल्याला कायम उजेड देणा-याContinue reading “दिव्यांची रसमलाई”
Tag Archives: Traditional Maharashtrian Sweet
तिळगुळाचे लाडू आणि गूळपोळी
आजची दुसरी पोस्ट आहे तिळगुळाचे मऊ लाडू आणि गूळपोळीची. हे तिळाचे लाडू करायला अतिशय सोपे आणि बिघडण्याची शक्यता शून्य असे आहेत. आपल्याकडे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी-कुंकू केलं जातं. हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमांमध्ये लुटण्याच्या वस्तूंबरोबरच तिळाच्या लाडवांमध्येही वैविध्य असतं. काही घरांमध्ये गुळाचा पाक करून लाडू केले जातात तर काही जण साखरेच्या पाकात करतात. काहीजण त्यात डाळवं, खोबरं, दाणे घालतात.Continue reading “तिळगुळाचे लाडू आणि गूळपोळी”
प्रसादाचे दहा पदार्थ
गणेश चतुर्थी अगदी जवळ आली आहे. विघ्नहर्ता आणि बुद्धीची देवता म्हणून कुठल्याही समारंभात आधी गणेशाचं पूजन करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. गणपती बाप्पा हे सगळ्यांच्या सोयीनं आपला मुक्काम ठेवतात. कुणाकडे दीड दिवस, कुणाकडे पाच दिवस, कुणाकडे गौरी-गणपती, कुणाकडे दहा दिवस असा सगळ्यांच्या सोयीनं गणपती बाप्पा त्या-त्या घरी राहातो. या दिवसात घरोघरी सकाळ-संध्याकाळ आरतीचे आवाज ऐकू येतात.Continue reading “प्रसादाचे दहा पदार्थ”
पुरणपोळी
आज होळी आहे. अर्थातच पुरणपोळीचा दिवस! मला फार कमी गोड पदार्थ मनापासून आवडतात, त्यातली एक पुरणपोळी आहे. लहान असताना आजी जेव्हा सणांना पुरणपोळ्या करायची तेव्हा लहान लहान वाट्यांमध्ये ताजं कढवलेलं तूप वाढायची. त्या तुपात भिजवलेली पुरणपोळी काय अफलातून लागायची! मला घरीच कढवलेलं तूप आवडतं विकतचं आवडत नाही हे आजी जाईपर्यंत म्हणजे तिच्या वयाच्या चौ-याण्णव्या वर्षापर्यंतContinue reading “पुरणपोळी”
तिळगुळाचे लाडू
नुकतीच संक्रांत झाली. अर्थातच घरोघरी गूळपोळ्या आणि तिळगुळाच्या लाडवांचा बेत झालाच असेल. मला गूळ-पोळी करता येत नाही. पण मला ती शिकायची आहे. तिळाचे लाडू मात्र मस्त जमतात, कारण हे तिळाचे लाडू करायला अतिशय सोपे आणि बिघडण्याची शक्यता शून्य असे आहेत. आपल्याकडे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी-कुंकू केलं जातं. हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमांमध्ये लुटण्याच्या वस्तूंबरोबरच तिळाच्या लाडवांमध्येही वैविध्य असतं. काहीContinue reading “तिळगुळाचे लाडू”
कोजागिरीचं दूध
लहानपणी कोजागिरी म्हणजे मोठी मजा असायची. किती तरी दिवस आधी कोजागिरीचं प्लॅनिंग असायचं. नुकत्याच सुरू झालेल्या गुलाबी थंडीत रात्री गच्चीवर भेळेसारखं काही तरी चटपटीत खाणं आणि नंतर मस्त आटवलेलं दूध अशी मेजवानी असायची. दूध करण्यासाठी दुधवाल्याला खास लक्षात ठेवून जास्त दूध घालायला सांगायचं, सुक्यामेव्याची खरेदी करायची असा सगळा जामनिमा असायचा. आता घराच्या बाहेर पडलं कीContinue reading “कोजागिरीचं दूध”
श्रीखंड
त्या-त्या सणाला ठरलेला पारंपरिक पदार्थ करायचा हा माझा शिरस्ता आहे. म्हणजे बाकी काही कर्मकांड करत नसले तरी परंपरा मला आवडतात. आणि मुख्य म्हणजे खाण्याच्या परंपरा तर आवडतातच आवडतात! तेव्हा दस-याची पारंपरिक पाककृती म्हणजे श्रीखंड. श्रीखंड, पुरी, बटाट्याची भाजी, मटकीची उसळ, काकडीची कोशिंबीर आणि तोंडलीभात असा मस्त मेन्यू करायचा. पोटभर जेवायचं आणि छानशी वामकुक्षी घ्यायची! श्रीखंडContinue reading “श्रीखंड”
रव्याचे मऊ लाडू
काल आम्हा फेसबुक मित्रमैत्रिणींचं एक गेटटुगेदर मुंबईत झालं. एकूण २६-२७ लोक होते. त्यातल्या फक्त दोघांना मी याआधी प्रत्यक्ष भेटले होते. एक माझा कॉलेजमधला मित्र अतुल खेरडे आणि मी दूरदर्शनला काम करत असतानाची सहकारी सोनाली जोशी असे दोन जण सोडले तर बाकी सगळ्यांना मी पहिल्यांदाच भेटले. पण खरं सांगते मला फार मजा आली. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कामContinue reading “रव्याचे मऊ लाडू”
कणकेचा शिरा
मला स्वतःला फारसं गोड खायला आवडत नाही. त्यामुळेच असेल पण मला फारसे गोड पदार्थ चांगले करता येत नाहीत. पण आता माझ्या रेसिपी पेजच्या निमित्तानं मीही नवीन गोड पदार्थ करून बघतेय. माझ्याकडे पाच दिवसांचा गणपती असतो. शेवटच्या दिवशी प्रसादासाठी मी कणकेचा शिरा केला होता. मला जे हातावर मोजता येतील असे गोड पदार्थ आवडतात त्यात कणकेचा शिराहीContinue reading “कणकेचा शिरा”
उकडीचे मोदक
तळलेल्या मोदकांची रेसिपी शेअर केल्यावर ब-याच जणांनी उकडीच्या मोदकांची रेसिपी शेअर करायची विनंती केली. आता खरी गोष्ट अशी की, मी स्वतः कधीच उकडीचे मोदक केले नव्हते. पण मग या निमित्तानं मीही उकडीचे मोदक करून बघायचे ठरवलं. तसे मी आज ते केले. अजून खाल्ले नाहीत, पण बरे झाले असावेत! माझ्या घरी मला मदत करणारी माझी मदतनीसContinue reading “उकडीचे मोदक”