भाताचे प्रकार – २

गेल्या पोस्टमध्ये मी भातांच्या नेहमी केल्या जाणा-या प्रकारांबद्दल लिहिलं होतं. कल्पनाशक्तीचा वापर केला तर आपण भाताचे कितीतरी प्रकार करू शकतो. आज त्याच पोस्टचा दुसरा भाग. कॉर्न पुलाव – १ वाटी तांदूळ असतील तर १ वाटी कॉर्न दाणे, १ वाटी गाजराचा कीस आणि अर्धी वाटी चिरलेली सिमला मिरची घ्या. तूपावर थोडा अख्खा गरम मसाला (२ लवंगा,Continue reading “भाताचे प्रकार – २”

झटपट दाल फ्राय आणि झटपट जिरा राईस

या आधी मी पनीरच्या भाजीची झटपट रेसिपी शेअर केली होती. त्या पोस्टमधे शेवटी मी लिहिलं होतं की ही भाजी, झटपट दालफ्राय आणि पराठ्यांबरोबर किंवा साध्या पोळ्यांबरोबर छान लागते. आज मी त्याच झटपट दाल फ्रायची रेसिपी शेअर करणार आहे. हे दाल फ्राय तुम्ही या भाजीबरोबर करा किंवा जिरा राईसबरोबर किंवा पुलावबरोबर करा, उत्तम लागतं आणि खरोखरContinue reading “झटपट दाल फ्राय आणि झटपट जिरा राईस”

व्हेज पुलाव आणि दही बुंदी

वन डिश मील हा प्रकार आता आपल्याकडेही रूळत चाललाय. अर्थात वन डिश मील हे नाव नवं पण पूर्वीही आपल्याकडे असे प्रकार होतेच की. थालिपीठं, खिचडी, उकडशेंगोळे, वरणफळं हे सगळे वन डिश मीलचेच प्रकार नाहीत का? आजच्या धकाधकीच्या जीवनात संध्याकाळी उशीरा कामावरून परत आल्यावर साग्रसंगीत स्वयंपाक करत बसण्याऐवजी असा एखादा साधा पण पौष्टिक प्रकार केला कीContinue reading “व्हेज पुलाव आणि दही बुंदी”

वांगी भात आणि वांग्याचे काप

पुलाव, सांबार-भात, दही-भात, मसालेभात, बिर्याणी! भात आणि भाताचे प्रकार! भाताला भारतीय खाद्यसंस्कृतीमधे अनन्यसाधारण महत्व आहे. भारतातल्या कुठल्याही राज्यात जा, त्या त्या राज्याची भाताची वैशिष्ट्यपूर्ण अशी पाककृती आहेच. अगदी महाराष्ट्रीय जेवणाचंच बघा नं, वरण भातानं जेवणाची सुरूवात होते तर दही भातानं अखेर. भातांच्या अशाच अनेक प्रकारांच्या पाककृती मी माझ्या या पेजवर शेअर करणार आहेच. शिवाय आताContinue reading “वांगी भात आणि वांग्याचे काप”

खिचडी-तेल

मला वाटतं भारतात असंख्य प्रकारांनी खिचडी केली जाते. प्रत्येक राज्यात, प्रत्येक धर्मात, प्रत्येक जातीत खिचडी करतातच. गुजराती लोकांची डाळ खिचडी आणि कढी तर प्रसिध्दच आहे. मारवाड्यांमध्ये घोट्टडी खिचडी (घोटून केलेली आसट खिचडी) करतात. दक्षिणेतला पोंगल हा खिचडीचाच एक प्रकार, शक्रे पोंगल हा खिचडीचा गोड भाऊ किंवा बहिण म्हणा हवं तर! बंगाल्यांमधेही खिचडी करतात. ईशान्य भारताच्याContinue reading “खिचडी-तेल”

नारळी भात

श्रावणातल्या सणांपैकी एक नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमेला कोळी समाजात महत्वाचं स्थान आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला समुद्र उधाणलेला असतो, शिवाय हा माशांच्या पैदाशीचा काळ म्हणून या काळात कोळी समुद्रात मासेमारीसाठी जात नाहीत. पण नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा करून मासेमारीला परत सुरूवात होते. थोडक्यात काय तर समुद्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा सण. किनारपट्टीवर अर्थातच नारळ मोठ्या प्रमाणावर पिकतातContinue reading “नारळी भात”