मसाला लायब्ररीतलं जेवण

आमच्या घराजवळच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये हल्ली वेगवेगळ्या प्रकारची किती तरी रेस्टॉरंट्स उघडली आहेत. म्हणजे अगदी साधं रोजचं जेवण देणारं टिफिन बॉक्स आहे, अप्रतिम पिझ्झा मिळणारं पिझ्झा एक्सप्रेस आहे, मला जिथला पिझ्झा अजिबात आवडत नाही ते कॅलिफोर्निया पिझ्झा किचन आहे, सँडविचेस, सॅलड्स, कॉन्टिनेंटल फ्यूजन फूड मिळणारी ल पॅ कुतँदिए (LPQ), कॅफे इन्फिनितो, स्मोक हाऊस डेली ही रेस्टॉरंट्स आहेत. मील्स इन अ बोल हे बर्मीज रेस्टॉरंट आहे. स्टार बक्स, थिओब्रोमा ही सुरेख कॉफी शॉप्स आणि टी ट्रेल्स आणि वाघ बकरी हे दोन टी लाऊंजेस आहेत. गुड वाइफ हा पब आहे. उत्तम डिमसम्स मिळणारं यावच्चा आहे. शिवाय ओबेरॉयचं ट्रायडन्ट आणि सोफिटेल ही दोन मोठी हॉटेल्स आहेत जिथे कितीतरी रेस्टॉरंट्स आहेत. एकूण काय तर एके काळी मागसलेलं मानलं जाणारं आमचं बँड्रा इस्ट हे हल्ली हॅपनिंग प्लेस झालेलं आहे (आजच्या पिढीची भाषा!)

अनीश प्रधान, मी आणि शुभा मुद्गल
अनीश प्रधान, मी आणि शुभा मुद्गल

याच वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये मसाला लायब्ररी हे फाइन डायनिंग रेस्टॉरंट आहे. हे रेस्टॉरंट जिग्स कालरा या ख्यातनाम शेफचं आहे. सध्या इन असलेलं फ्यूजन फूड या रेस्टॉरंटमध्ये मिळतं. म्हणजे भारतीय आणि पाश्चिमात्य पदार्थाचं मिश्रण करून केलेले पदार्थ किंवा भारतातल्याच दोन प्रांतातल्या पदार्थाचं मिश्रण करून केलेले पदार्थ. मी आधीही तीन-चारदा इथे जेवलेले आहे. नुकतंच माझ्या नव-याचा निरंजनचा मित्र अनीश प्रधान आणि त्याची बायको शुभा मुद्गल यांच्या बरोबर आम्ही इथे जेवायला गेलो होतो. अनीश निरंजनचा कॉलेजमधला मित्र. शिवाय अफलातून विनोदबुध्दी असलेला. शुभाजी (मी सहसा कुणाला जी लावत नाही पण इथे लावण्याचा मोह होतो आहे) जितक्या सुंदर गातात तितक्याच सुंदर बोलतातही. अनीश हा नामवंत तबलावादक आहे. त्यानं हल्लीच एकोणीसाव्या शतकातल्या मुंबईतल्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची परंपरा या विषयावर पुस्तक लिहिलं आहे.या दोघांची खासियत अशी की हे दोघेही आपापल्या क्षेत्रात इतके नावाजलेले असूनही अजिबात मोठेपणा मिरवत नाहीत. अगदी हिंदी चित्रपटसंगीतापासून, वृत्त वाहिन्या, नवीन पुस्तकं, टीव्ही मालिका, नवीन तंत्रज्ञान आणि अर्थातच खाद्यसंस्कृती अशा वेगवेगळ्या विषयांवर गप्पा किती तरी रंगल्या. फार मजा आली.

अनिश, शुभाजी आणि मी आणि निरंजन
अनिश, शुभाजी आणि मी आणि निरंजन

या रेस्टॉरंटनं सध्या शेफ्स टेस्टिंग मेन्यू सुरू केला आहे. व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारांमध्ये तो मिळतो. वेगवेगळ्या प्रकारची स्टार्टर्स, मेन कोर्स आणि मग अर्थातच डेझर्ट. या जेवणाची सुरूवात झाली ती मश्रूम चायनं. हो मश्रूमचा चहा! म्हणजे त्यांनी चहासारखा सगळा जामानिमा आणला. कपांमध्ये सुकी श्रेडेड मश्रूम्स घातली. त्यावर पावडर फॉर्ममध्ये असलेलं इटालियन तेल घातलं आणि मग त्यावर मश्रूम स्टॉक घातला. या मश्रूम चायची चव अफलातून लागत होती. त्यानंतर दाक्षिणात्य तैरसादम आणि त्यावर झुकिनी, अस्पॅरेगस आदी भाज्या ब्लांच करून घातल्या होत्या आणि बरोबर मसाला केळा वेफर्स, मस्त लागत होतं. नंतर एक पदार्थ होता तो आपल्या डाळ-खिचडीचे रिसोटो (भाताचा इटालियन प्रकार) बॉल्स करून ते तळले होते. असे तीन-चार प्रकारचे स्टार्टर्स खाल्ल्यानंतर मलबारी परोटा(असाच उच्चार करतात) आणि टोमॅटो चटणी, मसाला लायब्ररीची सुप्रसिध्द काली डाळ (खरंच फार अप्रतिम असते), दही वडा असा मेन कोर्स खाऊन तृप्त झालो. शेवटी रसमलाईचं एक आणि मोतीचूर काव्हियार असं एक डेझर्ट खाल्लं. फारच अफलातून जेवण होतं.


या जेवणाचे काही फोटो मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे. फोटो मोबाइलवर काढलेले असल्यानं नेहमीइतके स्पष्ट आलेले नाहीत.

2 thoughts on “मसाला लायब्ररीतलं जेवण

  1. Hi Sayali,
    कालच माटुंग्याला वेलिंगकर इंस्टीट्यूट मधला ‘मटा मैफल ‘ हा तुमचा कार्यक्रम बघितला..तुमची (तुम्ही स्वतः, सचिन कुंडलकर,कविता महाजन) चर्चा खूप आवडली..विशेषत: ब्लाॅग म्हणजे काय व (तो कशाशी खातात ते पूर्ण समजले) ..मी माझ्या कामासाठी नेटवर बराच वेळ असतो..पण ब्लाॅग हे फक्त एेकून माहित होत..कधी कुठल्या ब्लाॅगवर गेलो नाही..पण तुमच्या चर्चेतून कुतूहल जाणवल आणि सहजच प्रथम try केलं..आणि तुमचा ब्लाॅग पाहिला..अक्षरशः i went mad watching it..किती छान लिहिलय तुम्ही त्यात about various recipies..blog is so simple yet so nice..त्यावरील पदार्थ,त्यांचे photos,review abt various resturent in your visinity was so enjoying & yet knowledgeble..i completly lost in your blog…खरं तर मी सुध्दा एक चांगला(veg only) खवय्या आहे..पण मला एक साधी डिश देखिल बनवता येत नाही..पण तुमचा ब्लाॅग पाहून आणि अनेक रेसिपिच तुम्ही केलंल साधं,सोप वर्णन पाहून i also hv decided to prepare atleast one nice dish( अर्थात मला जमेल तेवढी) amongst it & give a surprise to my wife..& see her reaction to it..till then bye..hv great day..
    Keep on writing & giving great recipies ..best luck
    Sunil Sardesai
    Jogeshwari-Mumbai

    Like

    1. Thank you so much Sunil Sardesai! असा कुणी भरभरून प्रतिसाद दिला की खूप छान वाटतं. खूप बरं वाटलं. खरोखर एखादा पदार्थ करून बायकोला सरप्राइज द्या. आणि हो, फोटो नक्की पाठवा.

      Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: